आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर वुड्सला ‘प्लेअर ऑफ द इयर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- जगातील नंबर वन गोल्फपटू टायगर वुड्सने पीजीए टूरचा ‘प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्कार पटकावला. त्याने पुरस्काराच्या स्पर्धेत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम स्कॉट आणि स्वीडनच्या हेन्रिक स्टेनसनला पिछाडीवर टाकून पुरस्कार आपल्या नावे केला. त्याने करिअरमध्ये 11 वेळा पीजीए टूरचा हा पुरस्कार मिळवला. अमेरिकेच्या वुड्सने यंदाच्या सत्रात प्लेअर्स चॅम्पियनशिप आणि दोन वर्ल्ड गोल्फ स्पर्धेसह पाच किताब जिंकले आहेत. त्याने या वर्षी सर्वाधिक 85 लाख डॉलर जिंकून अर्नोल्ड पामर पुरस्कारही आपल्या नावे केला. वुड्स, स्कॉट आणि स्टेनसनशिवाय इंग्लंड ओपन विजेता फिल मिकलसन आणि मॅट कुचर यांचेही पुरस्कारासाठी नामांकन होते.