आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Woods Proposes To Ex wife Elin Nordegren, Report Says

पुनर्विवाहास टायगर वुड्स इच्छुक !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा- जगातील माजी नंबर वन गोल्फपटू टायगर वुड्स घटस्फोटित पत्नी एलिन नारदेग्रेनसोबत पुन्हा लग्न करण्यास इच्छुक आहे. तो यासाठी 21 कोटी डॉलर (11 अब्ज, 55 कोटी) देण्यास तयार आहे. घटस्फोट देताना त्याने 11 कोटी डॉलर दिले होते. टायगर वुड्सच्या या पुनर्विवाहाच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नाही.

वुड्सला पत्नी एलिन (33), मुलगी सामंता (5) व मुलगा चार्लीशिवाय (3) त्याचे मन रमत नाही. तो फारच भावुक झाला आहे. असे असले तरीही त्याच्या पत्नीचा अद्याप वुड्सवर विश्वास बसलेला नाही. विवाहबाह्य संबंधामुळे टायगरच्या पत्नीने घटस्फोट घेतला होता.