आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना तुटला Tiger चा दात, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - टाइगर वुड्सचा तुटलेला दात छायाचित्रात स्पष्टपणे दिसत आहे. - Divya Marathi
फोटो - टाइगर वुड्सचा तुटलेला दात छायाचित्रात स्पष्टपणे दिसत आहे.
इटली - एकेकाळी गोल्फमध्ये अग्रस्थानी राहिलेल्या टायगर वूड्सला एक मोठा धक्का बसला आहे. गर्लफ्रेंड लिंडसे वॉनच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी गेलेल्या वूड्सला अपघातात समोरील एक दात गमवावा लागला आहे. तेव्हापासून माध्यमांच्या कॅमेर्‍यांना टाळण्याचा प्रयत्न टायगर करत आहे. त्याने माध्यमांसमोर या घटनेचा उल्लेखही केलेला नाही.
कॅमेर्‍यामुळे पडला दात
टायगर वूड्सची गर्लफ्रेंड लिंडसे वॉनने स्कीइंग विश्वचषकाचा किताब जिंकल्यानंतर तिच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तो याठिकाणी पोहोचला होता. पुरस्कार वितरणादरम्यान एक फोटोग्राफर त्याचा कॅमेरा घेऊन वॉनकडे जात होता. त्याचवेळी अपघात झाला. त्यात टायगरचा एक दात तुटला. या अपघातानंतर तो माध्यमांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे.

एजंटने दिला दुजोरा
या अपघाताबाबत वूड्सच्या एजंटने दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की, त्याने सांगितले की, इटलीमध्ये स्कीइंग वर्ल्डकपमध्ये लिंडसे वॉनच्या विजयानंतर वूड्स तिला भेटायला गेला होता. अवॉर्ड पोडियम वर फोटोग्राफर्सची गर्दी झाली त्यावेळी एका फोटोग्राफरचा कॅमेरा वुड्सच्या तोंडाला लागला. त्यात त्याचा एक दात तुटला. वुड्सने स्वतःला लपवण्याचा प्रयत्नही केला. तोंडावर स्कार्फ बांधला पण त्याला चेहरा लपवता आला नाही. स्कार्फ खाली होताच माध्यमांनी त्याची छयाचित्रे घेतली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लिंडसे वॉन आणि टाइगर वूड्स यांच्या सेलिब्रेशनचे PHOTO