आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर वुड्सने जिंकला 75 वा किताब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ला जोल्ला- जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या गोल्फपटू टायगर वुड्सने मंगळवारी करिअरमधील 75 वा किताब पटकावला. यासह त्याने अमेरिकन पीजीए फार्मस इन्शुरन्स ओपन चषक आठव्यांदा आपल्या नावे केला. अंतिम फेरीत चार स्ट्रोक मारून त्याने चषकावर नाव कोरले.

वेगाच्या वार्‍यामुळे वुड्सला काही काळ अडचणीचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याने सुरेख कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अमेरिकेचा ब्रॅडेट स्नेडेकर व जोश टिटरला संयुक्तपणे दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.