Home »Sports »Other Sports» Tiger Woods Wooing His Wife Elin Back For 20 Crore Dollars

PHOTOS: पत्‍नीला पटवण्‍यासाठी वुड्स सोडणार 11 अब्‍ज रूपयांवर पाणी

दिव्‍य मराठी वेबटीम | Jan 18, 2013, 19:05 PM IST

फ्लोरिडा- गोल्‍फचा माजी अव्‍वल खेळाडू 37 वर्षीय टायगर वुड्स आपली घटस्‍फोटित पत्‍नी एलिन नारदेग्रेनशी पुन्‍हा विवाह करू इच्छितो. तो यासाठी 20 कोटी डॉलर (11 अब्‍ज, 55 कोटी रूपये) देण्‍यासही तयार आहे. घटस्‍फोट देताना वुड्सने पत्‍नीला 11 कोटी डॉलर (6 अब्‍ज, 5 कोटी रूपये) दिले होते.

टायगर वुड्सच्‍या सेक्रेटरीने दिलेल्‍या माहितीनुसार तो आपली पत्‍नी एलिना (33 वर्षे), मुलगी सामंता (5 वर्षे) यांच्‍याशिवाय राहू शकत नाही.

टायगर वुड्स जरी भावुक झाला असला तरी एलिना मात्र त्‍याच्‍यावर विश्‍वास ठेवण्‍यास तयारी नाही. वुड्सने डझनभर महिलांशी संबंध ठेवले होते. याची माहिती एलिनाला नव्‍हती. वुड्स आणि एलिनाने लग्‍नानंतर पाच वर्षांनंतर म्‍हणजे 2010 साली घटस्‍फोट घेतला होता. वुड्सने आपल्‍याला धोका देऊन इतर महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवल्‍याने एलिनाने हा निर्णय घेतला होता.

घटस्‍फोटानंतर टायगरने अनेक महिलांबरोबर डेटिंग केले होते. पण त्‍याला एकही संबंध टिकवता आले नाही.

टायगर वुड्सच्‍या टॉप 7 मैत्रिणींना पाहण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...

Next Article

Recommended