दिलशान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत न खेळण्याची शक्यता
agency | Update - Jun 08, 2011, 04:35 PM IST
श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही.
-
लंडन - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचे हाड मोडल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १९३ धावांची खेळी केली होती. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात १६ जूनपासून सुरवात होत आहे.दिलशान म्हणाला, या क्षणाला मी तिसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, याबाबत येत्या काही दिवसांत स्पष्ट होऊ शकेल. तिसऱ्या कसोटी सामन्यास दहा दिवस बाकी आहेत. इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकून यापूर्वीच मालिकेत आघाडी घेतली आहे.