Home | Sports | From The Field | tilakratne dilshan upset on team performance

'विश्वास बसत नाही आम्ही २५ षटके फलंदाजी करू शकलो नाही'

Agency | Update - May 31, 2011, 08:43 PM IST

श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने इंग्लंडविरुद्ध आम्ही २५ षटके खेळू न शकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्याने आम्हाला हा पराभव लवकरात लवकर विसरावा लागेल, असे म्हटले आहे

  • tilakratne dilshan upset on team performance

    कार्डीफ - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने इंग्लंडविरुद्ध आम्ही २५ षटके खेळू न शकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्याने आम्हाला हा पराभव लवकरात लवकर विसरावा लागेल, असे म्हटले आहे.

    इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात ४०० धावा करणाऱ्या श्रीलंकेचे फलंदाज दुसऱ्या डावात अवघ्या ८२ धावांत बाद झाले. एका वृत्तपत्राशी बोलताना दिलशान म्हणाला, संघाची फलंदाजी एवढी खराब का झाली हे मी सांगू शकत नाही. पण, आमची फलंदाजी खराब झाली. आम्हाला लवकरात लवकर हे विसरले पाहिजे. या सामन्यात आमचे सहा फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. त्यामुळे लॉर्डसवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत आम्हाला तयारीने उतरावे लागेल. हा सामना तीन जूनपासून सुरु होत आहे.

Trending