Home | Sports | From The Field | tim_bresnan, cricket, india, west indies

फिनला विश्रांती; ब्रेसननला दिली संधी

वृत्तसंस्था | Update - Jul 18, 2011, 06:52 AM IST

अ‍ॅशेसमध्ये चमकदार कामगिरी करणाºया यॉर्कशायरच्या वेगवान गोलंदाज ब्रेसननला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी संघामध्ये संधी देण्यात आली आहे.

 • tim_bresnan, cricket, india, west indies

  लंडन: अ‍ॅशेसमध्ये चमकदार कामगिरी करणाºया यॉर्कशायरच्या वेगवान गोलंदाज ब्रेसननला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी संघामध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या सामन्यामध्ये फिनला विश्रांती देण्याचा निर्णय इंग्लंड बोर्डाच्या निवड समितीने घेतला. येत्या २१ जुलैपासून खेळवल्या जाणाºया कसोटी मालिकेतल्या भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी नुकतीच इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. १२ सदस्यांच्या संघामध्ये एका फिरकीपटूची वर्णी लागली आहे. भारताच्या आघाडीच्या आव्हानाला मोडीत काढण्यासाठीच यजमान इंग्लंडची टीम अधिकच मजबूत करण्याचा प्रयत्न निवड समितीने केल्याचे दिसून येते.
  ब्रेसननला संधी
  भारताचे आव्हान मोडीत काढण्याचे मनसुबे रचलेल्या इंग्लंड बोर्डाच्या निवड समितीने संघात मोठा बदल घडवून आणला. फिनला वेळीच विश्रांती देण्याचा निर्णय घेणाºया निवड समितीने गोलंदाज टीम ब्रेसननला भारतविरुद्ध खेळण्याची सुवर्णसंधी
  दिली आहे.
  क्रम जैसे थे : कसोटी मालिकेत विजयी सलामीचे चित्र रंगवणाºया निवड समितीने फलंदाजाच्या क्रमवारीत कुठलाही बदल केला नाही. त्यामुळेच स्ट्रॉस व एलिस्टर कुक ही जोडी सलामीची खेळी करणार आहे.
  संघ : कर्णधार अ‍ॅण्ड्र्यू स्ट्रॉस, अ‍ॅलिस्टर कुक, जोनाथन ट्राट, केविन पीटरसन, इयान बेल, इयोन मार्गन, मैट प्रायर, ग्रीम स्वान, जेम्स अ‍ँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस ट्रेमलेट, टीम ब्रेसनन.
  सिरीज रोमांचक होणार
  क्रिकेटच्या विश्वात कसोटी सामने खेळण्याच्या क्रमवारीत आघाडीच्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील कसोटी मालिका अधिकच रोमांचक होण्याचे चित्र आहे. क्रमवारीतील भारताचे अव्वल स्थानाचे आव्हानाला संपुष्टात आणण्यासाठी इंग्लंड संघ चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास आहे.’’
  ज्यौफ मिलर, इंग्लंड

Trending