भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी / भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम ब्रेसनन इंग्लंड संघात

वृत्तसंस्था

Jul 17,2011 03:42:33 PM IST

इंग्लंड - भारताविरुद्ध लॉर्डस मैदानावर २१ जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या बारा सदस्यीय संघात टीम ब्रेसननला स्थान देण्यात आले आहे. ब्रेसननबरोबर स्टुअर्ट ब्रॉडलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

संघाचे कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉसकडे कायम ठेवण्यात आल आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर चार कसोटी सामने खेळणार आहे. स्टुअर्ट ब्रॉडने कौंटीमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संघात स्थान दिल्याचे निवड समितीच्या अध्यक्षांनी सांगितले. तसेच ऍशेस मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्टिवन फिन यालाही संघात स्थान देण्यात आले नाही. मधल्या फळीतील फलंदाज इयान मॉर्गनलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंड संघ - ऍण्ड्रयू स्ट्रॉस, ऍलिस्टर कूक, जॉनाथन ट्रॉट, केवीन पीटरसन, इयान बेल, इयान मॉर्गन, मॅट प्रायर, स्टुअर्ट ब्रॉड, ग्रॅमी स्वान, ख्रिस ट्रेमलेट, जेम्स अँडरसन, टीम ब्रेसनन.

X
COMMENT