आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई स्पर्धा: टिंटूला रौप्य, राणीला भालाफेकीत कांस्यपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - पी. टी. उषा यांची शिष्या टिंटू लुकाने अखेर आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवलीच. इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये ८०० मी. शर्यतीत टिंटूने रौप्यपदक जिंकले. भारतासाठी मैदानी खेळातील आणखी एक पदक अनू राणीने भालाफेकीत जिंकले. मैदानी खेळात बुधवारी भारताने दोन पदके जिंकली. ४०० मीटरच्या अडथळ्यांच्या शर्यतीत मागच्या वेळेसची चॅम्पियन अश्विनी अंकुजी या वेळी चौथ्या स्थानी आली.

टिंटू लुकाने एक मिनिट ५९.१९ सेकंदांच्या वेळेत रौप्यपदक आपल्या नावे केले. कझाकिस्तानच्या मार्गारिटा मुकाशोवाने अंतिम दहा मीटरमध्ये जबरदस्त चपळता दाखवताना टिंटूला मागे टाकले. तिने एक मिनिट ५९.०२ सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले.
चीनच्या जिंग झाओने
एक मिनिट ५९.४८ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. भारताच्या सुषमा देवीने दोन मिनिटे ०१.९२ सेकंदासह चौथे स्थान मिळवले.

अनूची सर्वश्रेष्ठ कामगिरी
अनूने आपले सर्वश्रेष्ठ वैयक्तिक प्रदर्शन करताना ५९.५३ मीटर दूर भाला फेकत कांस्यपदक जिंकले. अनूने आपल्या पहिल्या प्रयत्नातच हे अंतर कापले. नंतरच्या प्रयत्नात सुधारणा झाली नाही. ितला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. चीनच्या झांग लीने ६५.४७ मीटरच्या नव्या विक्रमासह सुवर्णपदक िजंकले. हा एिशयन गेम्सचा रेकॉर्ड ठरला. चीनच्याच ली लिगवेईने ६१.४३ मीटरच्या अंतरासह रौप्यपदक मिळवले.