आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Play In IPL 8, Take Ranji Trophy Seriously, Says Rahul Dravid

IPL:फिक्सिंग रोखण्यासाठी \'Honesty\'चा मंत्र, ड्रेसिंग रूममध्ये लावले \'Poster\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आयपीएल-8 मधील प्रत्येक संघांच्या ड्रेसिंग रूममध्ये बीसीसीआने अशा प्रकारचे पोस्टर लावले आहे.)

नवी दिल्ली- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील फिक्सिंग रोखण्‍यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदा सतर्कता बाळगली आहे. बीसीसीआयने आयपीएल-8 सुरु होण्यापूर्वी संघांच्या ड्रेसिंग रूम में 'Honesty'चा (प्रामाणिकपणा) संदेश देणारे पोस्टर लावले आहे. याशिवाय सर्व क्रिकेटपटूंना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे संकेत देखील दिले आहेत.

'नेतृत्व(Leadership), जबाबदारी(Accountity) , मनोरंजन(Enjoyment), अभिमान(Pride), सन्मान (Respect), विश्वास(Turst) आणि एकात्मता (Integruty) ही मुल्ये एकत्र करून इंग्रजीतील 'Honesty' हा शब्द तयार करण्यात आला आहे. दूसरीकडे, बीसीसीआयने आयपीएल-8च्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत‍अंपायर्ससाठी एका वर्कशॉप आयोजित केले होते. आयपीएलमधील फिक्सिंगसह अन्य प्रकारावर अंपायर्सनी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आला आहेत.

तसेच टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक राहुल द्रविडने देखील क्रिकेटपटूंना फिक्सिंगपासून सावध राहाण्‍याचा सल्ला दिला आहे. फ्रेंचाइजीने देखील 2013 मधील फिक्सिंग प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केली आहे.

'आयपीएलने मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग स्कॅंडलमधून चांगलाच धडा घेतला आहे. राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू देखील सतर्क असल्याचेही राहुलने यावेळी सांगितले.

काय झाले होते 2013 मध्ये...
2013मध्ये झालेल्या आयपीएल-6 स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगवरून खळबळ माजली होती. राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू श्रीसंथसह तिघांनी फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. श्रीसंथ, अंकित चव्हाण आणि अजीत चंदीलाला दिल्ली पोलिसांनी अटक केले आहे. तसेच बीसीसीआयनेही तिन्ही दोषींवर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घातली आहे.