आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Think Contribution ; Advice Of Sachin Tendulkar To Young Players

योगदानाविषयी विचार करायला हवा - सचिन तेंडुलकरचा युवा खेळाडूंना सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रचंड मेहनत व बांधिलकीमुळे व्यक्ती आपल्या सहका-यांकडून मान मिळवू शकतो. प्रतिस्पर्धीमुळे निराश होऊ नका. आपण फक्त बांधिलकी, प्रयत्न व योगदानाविषयी विचार करायला हवा, असा सल्ला सचिन तेंडुलकरने युवा खेळाडूंना दिला.

‘इतर लोक काय करतात यामुळे निराश होऊ नको, असे मी मुलाला सांगतो. आपण चांगले काम केले तर संघ आपले अनुकरण करतो. या ठिकाणी नेहमी प्रतिस्पर्धी असतात. मेहनत केल्यानंतर नशीब आपोआप पालटते. जीवनात अनेक आव्हाने असतात. मात्र, अपार कष्टामुळे तुम्ही आव्हानांवर विजय मिळवू शकता. यासाठी नशिबाचा विचार करू नका. फक्त मेहनतीवर लक्ष्य केंद्रित करा. सातत्यपूर्ण कामगिरी टिकून राहील असे नाही. मात्र, मजबूत व्यक्ती संकटाचा धाडसाने सामना करू शकते,’ असेही त्याने या वेळी सांगितले.