आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत दौर्‍यासाठी आज ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- पुढच्या महिन्यात रंगणार्‍या भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा गुरुवारी करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाची घोषणा गुरुवारी पर्थ येथे निवड समितीच्या बैठकीनंतर करण्यात येईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.

दोन्ही संघांत चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका फेब्रुवारी-मार्च महिन्यांत रंगेल. हे चार सामने अनुक्रमे चेन्नई, हैदराबाद, मोहाली, नवी दिल्ली येथे होतील. दोन्ही देशांतील मालिकेला 22 फेब्रुवारीपासून चेन्नई येथील कसोटीने प्रारंभ होईल. अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनला भारत दौर्‍यासाठी संघात संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.