आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज बीसीसीआयची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्पॉट फिक्सिंगप्रकरणी केलेली चौकशी बेकायदेशीर असल्याचा निकाल देऊन मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय कार्यकारी समितीची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली आहे. इतकी प्रचंड आरडाओरड होऊनही बीसीसआयच्या अध्यक्षपदी श्रीनिवासनच पुन्हा परतल्याने या बैठकीला महत्व आले आहे. शुक्रवारच्या बैठकीचे आपणच अध्यक्षपद भुषवणार असल्याचे र्शीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी समितीवरच आक्षेप घेतल्याने या बैठकीत सर्व कायदेशीर बाबींवर विचार करण्यात येणार आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवायचा की पोलिसांकडून त्याबाबतच्या कारवाईची पूर्तता होईपर्यंत वाट पाहायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी यावेळी फेरसमितीची निवड केली जाण्याची शक्यता आहे.