आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी ब्रिगेड आज तरी जिंकणार काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांचा मालिकेतील पाचवा वनडे शुक्रवारी होईल. हा सामना जिंकून मालिकेत शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने चारपैकी तीन सामन्यांत विजयश्री मिळवून मालिका खिशात घातली. एक सामना टाय झाला. आता शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
विदेशी खेळपट्टीवर टीम इंडियाची सुमार गोलंदाजी आणि फलंदाजी जगजाहीर झाली आहे. भारताच्या दोन्ही बाजू या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ न्यूझीलंडमध्येही मालिका गमावल्याने भारतीय संघाचे मनोबल डगमगले आहे.


...तरीही सामना अधिक महत्त्वाचा!
मालिकेपाठोपाठ भारताने नंबर वनचे स्थानही गमावले आहे. मात्र, आता हा शेवटचा सामना टीम इंडियासाठी अधिक महत्त्वाचा आहे. कारण न्यूझीलंडमध्ये भारताने आतापर्यंत एकही सामना जिंकला नाही. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ मालिकेतील पराभवाचे अंतर कमी करून टीकाकारांना शांत करू शकेल.


जडेजाने मनोबल वाढवले
दोन सामन्यांपासून शानदार फलंदाजी करणा-या रवींद्र जडेजाने गुरुवारी संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. ‘चिंता सोडून द्या. सामन्यात सकारात्मक निकाल लागेल,’ असे तो म्हणाला.


गोलंदाजांना धोनीचा सल्ला
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांशी चर्चा केली. धावा अधिक न देण्याचा सल्लाही त्याने गोलंदाजांना दिला. अश्विन आणि जडेजा चांगली कामगिरी करत असल्याचे त्याने सांगितले.


दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, मो. शमी, ईश्वर पांडे, भुवनेश्वरकुमार.
न्यूझीलंड : ब्रेंडन मॅक्लुम (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, जेसी रायडर, केन विलियसन, रॉस टेलर, ब्रेंडन मॅक्लुम, कोरी अँडरसन, जेस निशाम, ल्यूक रोंची, नॅथन मॅक्लुम, हामिश बेनेट, केली मिल्स, टीम साऊथी, मिशेल मॅक्लिनघन.