आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इटली हॉकी मालिका आजपासून रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुरुवारपासून (दि. ४ डिसेंबर) भारत आणि इटली यांच्यातील हॉकी मालिकेला प्रारंभ होत आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय महिला संघ मंगळवारी इटलीला रवाना झाला आहे. रितु राणीच्या नेतृत्वाखाली महिला संघ हा दौरा करत आहे.

आगामी मार्च महिन्यात वर्ल्ड लीग राउंड-२ हॉकी स्पर्धा हाेणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी हॉकी इंडियाने भारतीय महिला संघाच्या इटली दौ-याचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या इंचियोन आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदकाची कमाई केली.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीची लय वर्ल्ड लीगमध्येही कायम ठेवण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल.

‘इटली दौ-यात भारतीय महिला संघ चांगली कामगिरी करतील, असा मला विश्वास आहे. गत काही दिवसांपासून महिला संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे,’अशी प्रतिक्रिया मुख्य प्रशिक्षक नेल हावगुड यांनी दिली.

वर्ल्ड लीगसाठी फायदा : राणी
पाच हॉकी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ इटली दौ-यावर जात आहे. हा दौरा आगामी वर्ल्ड लीग राउंड-२ साठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. महिला संघाला या दौ-यातून वर्ल्ड लीगची तयारी करता येईल. या मालिकेसाठी संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. तसेच ही मालिका आपल्या नावे करण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत, असे मत भारतीय महिला संघाची कर्णधार रितु राणीने व्यक्त केले.

०४ डिसेंबरपासून मालिका
०५ सामन्यांचे आयोजन
१२ डिसेंबरला समारोप
०६ डिसेंबरदुसरा सामना
०७ डिसेंबरतिसरा सामना
०९ डिसेंबरचौथा सामना
११ डिसेंबरपाचवा सामना