आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - गतवर्षी आयपीएल स्पर्धा शाहरुख खानच्या वानखेडे स्टेडियममधील गैरवर्तनामुळे गाजली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यानंतर शाहरुख खानला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. शाहरुख खानवरील बंदीची ती शिक्षा रद्द व्हावी यासाठी त्या क्षणापासून अनेक जण प्रयत्न करत होते.
शाहरुखच्या बंदीच्या निर्णयावर फेरविचार करण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनला विनंती करण्यासाठी बीसीसीआयने शनिवारी दुपारी 4 वाजता वानखेडे स्टेडियमवर बैठक आयोजित केली आहे. बीसीसीआयच्या वतीने कोण या बैठकीला उपस्थित राहणार, हे निश्चित नसले तरीही शाहरुख खानवरील बंदी उठवण्यासाठी बीसीसीआयचे उपाध्यक्ष व आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला प्रयत्नशील आहेत, हे सर्वश्रुत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची मासिक बैठक येत्या 1 एप्रिल रोजी असल्याचे कळते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.