आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Shesh India karnatka Match, All Eyes On Ankit

शेष भारत-कर्नाटक सामना आज; अंकितकडे लक्ष !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - इराणी चषक क्रिकेट स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत हरभजनसिंगच्या शेष भारत आणि विनयकुमारच्या कर्नाटक संघात सामना रंगणार आहे. नुकतेच महाराष्ट्राला नमवून कर्नाटकने सातव्यांदा रणजी करंडक आपल्या नावे केला आहे. यातील विजयाने कर्नाटकचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. औरंगाबादचा युवा खेळाडू अंकित बावणेच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
हा सामना दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यातून आगामी टी-20 विश्वचषक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाईल. या स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीतून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा गौतम गंभीरचा प्रयत्न असेल.
कर्नाटक पाच वेळा विजेता
इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकची कामगिरी समाधानकारक ठरलेली आहे. या टीमने आतापर्यंत पाच वेळा इराणी चषक आपल्या नावे केला. कर्नाटकने 1998-99 मध्ये शेवटचा पाचव्यांदा चषक जिंकला होता. तसेच घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करण्याचा कर्नाटक टीम प्रयत्न करणार आहे.
अंकित, केदार मोठ्या खेळीसाठी सज्ज
औरंगाबादचा युवा खेळाडू अंकित बावणे आणि केदार जाधव रविवारपासून खेळवल्या जाणा-या कर्नाटकविरुद्धच्या
सामन्यात मोठ्या खेळीसाठी सज्ज आहेत. केदारने रणजीत यंदा 1223 धावा काढल्या. या सत्रात अंकितची बॅट तळपली असून त्याने 731 धावा काढल्या आहेत. यात एका शतकासह सात अर्धशतके झळकावली. त्याने अखेरच्या तीन सामन्यात अर्धशतके ठोकली.
संभाव्य संघ
शेष भारत : हरभजनसिंग (कर्णधार), गौतम गंभीर, अंकित बावणे, केदार जाधव, जीवनज्योतसिंग, बाबा अपराजित, दिनेश कार्तिक, अमित मिश्रा, पंकजसिंग, अशोक डिंडा, परवेझ रसूल, वरुण अ‍ॅरोन, अनुरितसिंग, नटराज बेहेडा, मनदीपसिंग.
कर्नाटक : विनयकुमार (कर्णधार), रॉबिन उथप्पा, लोकेश राहुल, गणेश सतीश, मनीष पांडे, सीएम गौतम, करुण नायर, श्रेयस गोपाल, अभिमन्यू मिथुन, अमित वर्मा, मयंक अग्रवाल, श्रीकांत अरविंद, एच.एस. शरत, रोनित मोरे, अबरार काजी.