आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंका वा बॅगा भरा; भारतासमोर आज यजमान वेस्ट इंडीजचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - तिरंगी वनडे क्रिकेट मालिकेत भारतासमोर शुक्रवारी ‘करा किंवा मरा’ची स्थिती असेल. तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजकडून दुस-या सामन्यात श्रीलंकेकडून 161 धावांनी पराभव झाला होता. शुक्रवारी होणा-या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत भारताला विजय मिळवावा लागेल. अन्यथा स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की टीम इंडियावर असेल. तीन देशांच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीत वेस्ट इंडीजने दोन आणि श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे.


टीम इंडियाकडून आशा
सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवनशिवाय मधल्या फळीत सुरेश रैना, विराट कोहली, अष्टपैलू रवींद्र जडेजा, मुरली विजय, दिनेश कार्तिक आणि धोनीच्या जागी संघात सामील झालेला अंबाती रायडू टीम इंडियाकडे आहे.
मागच्या सामन्यात गोलंदाजांनी निराश केले होते. शमी अहेमद (68), उमेश यादव (64), ईशांत शर्मा (68), रवींद्र जडेजा (55) यांनी खूप धावा दिल्या. मात्र त्यांना एकही विकेट घेता आली नाही. अश्विनने 67 धावांत एक विकेट घेतली होती.
दोन्ही संभाव्य संघ - भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, मुरली विजय, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव, शमी अहेमद, अमित मिश्रा.


वेस्ट इंडीज : डॅरेन ब्राव्हो (कर्णधार), क्रिस गेल, जॉन्सन चार्ल्स, डेवेन स्मिथ, मार्लोन सॅम्युअल्स, डेवेन ब्राव्हो, केरोन पोलार्ड, दिनेश रामदीन, डॅरेन सॅमी, केमर रोच, सुनील नारायण, टिनो बेस्ट.