आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली कसोटीसाठी टीम इंडियाची निवड आज ; सेहवाग,हरभजन प्रतिक्षेच्या यादीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली (14 ते 18 मार्च) आणि दिल्ली कसोटीसाठी (22 ते 26 मार्च) टीम इंडियाची संघ निवड गुरुवारी होईल. पहिल्या दोन कसोटींत विजय मिळवणा-या भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, वीरेंद्र सेहवागबाबत अंदाज बांधले जात आहेत. वर्षाच्या अखेरीस होणा-या दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी वीरेंद्र सेहवागला संधी द्यायची आहे की नाही, हे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने आतापासूनच निश्चित केले पाहिजे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.

मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघात कोणातही बदल होण्याची शक्यता नाही. प्रथेनुसार विजयी संघच कायम ठेवल्या जातो. असे असले तरीही दोन्ही कसोटींत भारताची सलामी हा चिंतेचा विषय राहिला आहे. चेन्नई आणि हैदराबाद येथील तीन डावात सेहवागला केवळ 2, 19 आणि 6 धावाच काढता आल्या. दुसरीकडे मुरली विजयने हैदराबादेत शानदार 167 धावा ठोकल्या होत्या.

भारतीय फलंदाजीत इतर स्थानांसाठी चिंता नाही. गोलंदाजीत दोन वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमार आणि इशांत शर्मावर पुन्हा विश्वास टाकला जाऊ शकतो. भारताच्या तिन्ही फिरकीपटूंत रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी धमाल गोलंदाजी केली होती. दोन्ही कसोटीत विजय मिळवल्याचा फायदा हरभजनसिंगलासुद्धा मिळू शकतो. तो कसोटी संघातील आपली जागा कायम ठेवू शकतो.

भारताने एखादा सामना गमावला असता तर निवड समितीच्या डोक्याला ताण वाढला असता. मात्र, सलग विजयामुळे संघ निवड अधिक सोपी झाली आहे.
ख्वाजा, स्मिथला मिळू शकते संधी
दुसरीकडे मोहाली कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम अकरा खेळाडूंत उस्मान ख्वाजा आणि स्टिवन स्मिथ या दोघांना संधी मिळू शकते, असे ऑस्ट्रेलियाचे कोच मिकी ऑर्थर यांनी सांगितले.

सेहवागची कामगिरी
2011 पासून आतापर्यंत
कसोटी धावा 100 50
18 916 1 5
मागच्या दहा कसोटींत
कसोटी धावा 100 50
10 532 1 1
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीरूची कामगिरी
2, 19 चेन्नई कसोटी
06 हैदराबाद कसोटी