आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी ऑलिम्पिक आजपासून सोचीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोची - रशियात शुक्रवारपासून 22 व्या हिवाळी ऑलिम्पिकला प्रारंभ होत आहे. ही जगातील सर्वात महागडी स्पर्धा मानल्या जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांच्याकडे ऑलिम्पिकची क्रीडा ज्योत सोपवली.
तब्बल 120 दिवसांनी 65 हजार किमींचा अविरत प्रवास करून ही क्रीडा ज्योत सोची येथे दाखल झाली. या क्रीडा ज्योतीने 25 हजार किमींचा प्रवास विमानाने केला. या मोहिमेला 7 ऑक्टोबर 2013 मध्ये रशियाची राजधानी मॉस्को येथे प्रारंभ झाला होता. ही स्पर्धा 7 ते 23 फेब्रुवारीदरम्यान रंगणार आहे. यात भारताचेही खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत 16 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे 300 पेक्षा अधिक जवान कडक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले.