आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Woman Boxing Competition Starts, Divya Marathi

महिला बॉक्सिंग स्पर्धा आजपासून, तब्बल दोन वर्षांनंतर स्पर्धेचे आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - तब्बल दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदा महिलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा ११ ते १६ ऑक्टोबरदरम्यान रायपूरच्या इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमदेखील सहभागी होणार आहे. या स्पर्धेतून आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठीचा भारतीय संघ निवडला जाईल.

या स्पर्धेत ३२ संघ सहभागी होणार आहेत. यातील २१० महिला बॉक्सर पदकांसाठी आपले नशीब आजमावतील. बॉक्सिंग महासंघाच्या निलंबनामुळे मागील दोन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करता आले नाही. मात्र, भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे नवनियुक्त अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी स्पर्धा आयोजनाचा निर्णय घेतला. या स्पर्धेतून दक्षिण कोरियात होणा-या वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला जाईल.