आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Youth Team Of India Australia Fighting In Final Match

भारत-ऑस्ट्रेलिया युवा संघांत आज अंतिम सामना रंगणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डार्विन - भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघासमोर शुक्रवारी तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. भारतीय संघाकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. भारतीय युवा संघाने तिरंगी मालिकेत शानदार कामगिरी करताना सलग चार सामने जिंकले.


भारताने मागच्या वर्षी उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियातच 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला होता. या वेळी भारताचे नेतृत्व विजय झोलच्या हाती आहे. या वेळी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवण्याची चांगली संधी विजय झोलकडे आहे.


भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 47 धावांनी, नंतर न्यूझीलंडला 165 धावांनी, तिस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने आणि चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला 7 विकेटने हरवले होते. विजयाची ही लय फायनलमध्येही कायम ठेवण्याचा भारतीय युवा संघाचा इरादा असेल.


फायनलमध्ये भारताची मदार झोलवरच असेल. तो एक आणखी शानदार खेळी करून भारताला विजय मिळवून देऊ शकतो. इतर भारतीय फलंदाजांत अखिल हिरवादकरने चार सामन्यांत 165 धावा, संजू सॅमसनने चार सामन्यांत 92 धावा, अंकुश बैसने तीन सामन्यांत 89 धावा काढल्या आहेत. भारताच्या सशक्त फलंदाजीने फायनलमध्ये रंग दाखवला तर टीम इंडियाला विजेतेपद जिंकण्यापासून रोखणे कठीण आहे.


विजय झोल जबरदस्त फॉर्मात
भारताचा कर्णधार विजय झोल स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने चार सामन्यांत 94.66 च्या सरासरीने सर्वाधिक 284 धावा काढल्या आहेत. स्पर्धेतील एकमेव शतक (128) झोलच्या नावे जमा आहे. झोलने याशिवाय एक अर्धशतकही झळकावले आहे. चार सामन्यांत विजयने 35 चौकार आणि 2 षटकार ठोकले आहेत.