युवराजची ही धडाकेबाज / युवराजची ही धडाकेबाज खेळी विसरणे अशक्‍यच, पाहा व्हिडिओ...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 12,2011 02:03:44 PM IST

नवी दिल्‍ली- टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज युवराज सिंहने आज आपल्‍या वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्‍या 11 वर्षाच्‍या क्रिकेट का‍रकिर्दीत त्‍याने अनेक विक्रमांना आपल्‍या कवेत घेतले आहे. 12 डिसेंबर 1981 मध्‍ये चंदीगडमध्‍ये जन्‍मलेल्‍या युवराज सिंहने भारताला 2011 चा विश्‍वचषक जिंकून देण्‍यात महत्‍वाची भूमिका बजावली आहे.
युवराज सिंहने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 3 ऑक्‍टोबर 2000 रोजी पदार्पण केले. आपल्‍या कारकिर्दीत त्‍याने अनेक यशाची शिखरे काबीज केली. युवराजने 274 एकदिवसीय सामन्‍यातील 252 डावात 8051 धावा बनवल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये त्‍याची 139 ही सर्वोच्‍च धावसंख्‍या आहे. एकदिवसीय सामन्‍यात युवराजच्‍या नावे 49 अर्धशतके आणि 13 शतके आहेत. तर 37 कसोटीच्‍या 57 डावांमध्‍ये तीन शतकांसह 1775 धावा बनवल्‍या आहेत.
प्रतिस्‍पर्धी संघातील गोलंदाजांना धडकी भरवणारा युवराज षटकार मारण्‍यासाठी प्रसिध्‍द आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये युवराज सिंहने 144 षटकार मारले आहेत. टी-20 विश्‍वचषकात युवराजच्‍या नावे सहा चेंडूवर सहा षटकार लगावण्‍याचा विक्रम आहे. इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज स्‍टुअर्ट ब्रॉडला त्‍याने सहा चेंडूवर सहा षटकार मारले होते. युवराजचे नाव घेताच त्‍याची ही खेळी सर्वांना आठवते. सोबतच्‍या व्हिडिओमध्‍ये पाहा युवराजची ही धमाकेदार आणि अद्भुत खेळी...
युवराजला वाढदिवसानिमित्‍त दिव्‍य मराठीतर्फे हार्दिक शुभेच्‍छा!!!





X
COMMENT