आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे TOP-10 खेळाडू, हॉकीपासून बुध्‍दीबळाच्‍या 64 घरांपर्यंत यांनी केलं राज्‍य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना आज भारतरत्नने सन्मानित केले गेले आहे. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू असून या पुरस्काराने सन्मानित होणारा सर्वात तरुण भारतीय आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळातही भारतीय खेळाडूंनी आपली चमक दाखविली आहे. आपल्‍या दैदिप्‍यमान कर्तबगारिने त्‍यांनी विश्‍वविजेतेपद मिळविले आहे. अशा TOP 10 खेळाडूंविषयी आज आम्‍ही सांगणार आहोत.

मेजर ध्‍यानचंद (हॉकी)
मेजर ध्‍यानचंद यांना हॉकीतील 'जादुगार' म्‍हणून ओळखले जाते. हॉकी खेळाडू ते भारताच्‍या हॉकीसंघाचा कर्णधार म्‍हणून त्‍यांनी नावलौकिक मिळविला.

मेजर ध्‍यानचंद यांच्‍या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिकमध्‍ये तीन सुवर्ण पदके पटकाविली होती. (1928 अँमस्‍टरडॅम, 1932 लॉस एंजेल्‍स, आणि 1936 बर्लिन)

मेजर ध्‍यानचंद यांचा जन्‍म 29 ऑगस्‍ट रोजी झाला. त्‍यांच्‍या स्‍मृतीत हा दिवस आता भारतात 'राष्‍टीय खेळ दिवस' म्‍हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्‍ट्रपती भवन येथे खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्‍कार, अर्जून पुरस्‍कार, द्रोणाचार्य पुरस्‍कार गौरविले.
अधिक खेळाडूंविषयी जाणून घ्‍या, पुढील स्‍लाइडवर...