आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक मॅचेसमधील 10 सर्वात बदनाम मोमेंट, पाहा क्रिकेटमधील बॅड Boys

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरण मोरेंनी यष्टीमागे कमेंट्स पास केल्यानंतर चिडलेल्या जावेद मियांदादने विजय मिळवताच मोरेसमोर अशा माकडउड्या मारल्या होत्या. ही घटना 1992 मधील विश्वकरंडक स्पर्धेतील आहे. पाकिस्तानने एकदाच व तोही 1992 मध्ये विश्वकरंडक जिंकला आहे. - Divya Marathi
किरण मोरेंनी यष्टीमागे कमेंट्स पास केल्यानंतर चिडलेल्या जावेद मियांदादने विजय मिळवताच मोरेसमोर अशा माकडउड्या मारल्या होत्या. ही घटना 1992 मधील विश्वकरंडक स्पर्धेतील आहे. पाकिस्तानने एकदाच व तोही 1992 मध्ये विश्वकरंडक जिंकला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा ऑल टाईम टॉप क्रिकेटर्सपैकी एक असलेला सईद अन्वर आज 48 वर्षाचा (6 सप्टेंबर 1968) होत आहे. अन्वर पाकिस्तानमधील इतर खेळाडूपेक्षा वेगळा म्हणजे शिकला-सवरलेला आहे. असे असूनही तो अनेक वादात अडकला. त्याची प्रतिमा पाकिस्तानमधील बॅड ब्वॉईजमध्ये होती. त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचे आयुष्यातच बदलून गेले. अशी राहिली पर्सनल लाईफ...
- अन्वरने कराचीतील NED यूनिवर्सिटीत इंजिनियरिंग केले आहे.
- वर्ष 2001 मध्ये एका मोठ्या आजारामुळे अन्वरची मुलगी बिस्माह हिचा मृत्यू झाला. या घटनेने अन्वरला संपूर्णपणे बदलून टाकले.
- मुलीच्या मृत्यूनंतर तो इस्लाम धर्माकडे झुकला व तो खूपच धार्मिक झाला. तो धर्माचा प्रचार करणा-या तब्लिगी जमातीसोबत जोडला गेला.
- एवढेच नव्हे तर त्याने त्या दरम्यान काही काळ क्रिकेटपासून फारकत घेतली. वर्ष 2005 मध्ये त्याचे नाव युसूफ योहानाला धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडल्याबाबत जोडले गेले होते.
- सईद अन्वरवर युसूफ योहानाला ख्रिश्चन धर्मापासून मुस्लिम बनविण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप झाला.
कसे राहिले क्रिकेट करियर
- अन्वरने 1989 ते 2003 दरम्यान 55 कसोटीत 4052 धावा केल्या. तर 247 वनडे मॅचमध्ये त्याने 8824 धावा केल्या.
- अन्वर पाकिस्तानकडून वनडे मॅचेसमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज आहे. त्याने 20 ODI शतके ठोकली आहेत.
- अन्वरने 1997 मध्ये भारताविरोधात वनडेत 194 धावा केल्या होत्या. जो त्या काळातील सर्वाधिक ODI धावसंख्या होती.
- सईद अन्वरशिवाय पाकिस्तान टीममध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांचे नाते कायम वादाशी राहिले.
- खासकरून इंडिया-पाकिस्तान यांच्यातील जेव्हा जेव्हा मॅच होत असत तेव्हा या दोन्ही संघात जोरदार संघर्ष पाहायला मिळायचा.
आम्ही आज तुम्हाला भारत -पाक मॅचदरम्यान आजपर्यंत घडलेल्या काही ठळक घटनांची माहिती सांगणार आहोत...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारत-पाक मॅचेसमध्ये कधी कधी झाली ताणाताणी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...