आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Cup: या 10 बॉलर्सच्या तालावर नाचतील फलंदाज, शमी आघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : मोहम्मद शमी, डेल स्टेन आणि रवींद्र जडेजा - Divya Marathi
फोटो : मोहम्मद शमी, डेल स्टेन आणि रवींद्र जडेजा
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जस जशी जवळ येत आहे, तसा तसा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर विश्वचषक स्पर्धा होत असल्याने गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार हे स्पष्ट झाले आहे. त्याचे कारण म्हणजे येथील खेळपट्ट्या गोलंदाजांसाठी गोलंदाजांसाठी अधिक फायदेशीर असतात. आज आम्ही अशा दहा गोलंदाजांविषयी माहिती देणार आहोत, जे या विश्वचषकाचा एक भाग असतील आणि फलंदाजांना बोटाच्या तालावर नाचवतील.

टॉपवर मोहम्मद शमी
तुम्हाला हे जाणून आनंद होइल की, या आघाडीवर भारताने बाजी मारली आहे. त्याचे कारण म्हणजे या यादीत सर्वात वर नाव आहे ते भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे. बळी मिळवणे असो किंवा सरासरी दोन्ही बाबतीत भारताच्या या वाघाने बाजी मारली आहे.

वर्षभरात 38 बळी
शमीने गेल्यावर्षी 41.3 षटके गोलंदाजी करत 38 बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीची सरासरी 22.94 आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी 4/36 अशी आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी कोणत्या गोलंदाजांच्या जोरदार गोलंदाजीची धार पाहायला मिळणार...