IPL 8 मध्ये आतापर्यंत 32 सामने झाले आहेत. स्पर्धा सध्या अत्यंत रंजक स्थितीत पोहोचली आहे. गुमतक्त्यातही अत्यंत वेगाने संघांची जागा बदलत आहे. चेन्नई सुपरकिंग्स सध्या टॉप वर आहे. तर स्पर्धेच्या सुरुवातीला टॉपला राहिलेला राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सुरुवातीला दिल्ली डेअरडेव्हील्सचा संघ तळाला होता. पण सध्या ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
रोज होणाऱ्या सामन्यांमधून नवीन टॅलेंट समोर येत आहे. आयपीएल हे एक असे प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी प्रत्येक खेळाडुला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. ज्याला त्या सधीचे सोने करता आले त्याची अगदी देशासाठी खेळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पर्वातही कोणी बॅटने तर कोणी बॉलने
आपली ताकद दाखवून देत आहे. त्याचवेळी फिल्डर्सही मैदानावर प्राण ओतून फिल्डींग करत असल्याचे दिसून आले. आयपीएलमध्ये आजवर अनेक अशा कॅचेस घेतल्या गेल्या आहेत ज्या आपल्याला आंतरराष्ट्रीय सामन्यातही पाहायला मिळत नाहीत. अशाच काही अप्रितच कॅचेस तुम्हाला दाखवणार आहोत.
नोट : सर्व फोटो व्हिडिओ फुटेजवरून घेण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आयपीएल-8 च्या बेस्ट कॅचेस...
1. चेन्नई सुपरकिंग्सच्या ड्वेन ब्राव्होने कोलकाता नाइटरायडर्सच्या सूर्यकुमार यादवची उत्कृष्ट कॅच घेतली.
2. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधरा जॉर्ज बेलीची कॅच घेण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या टिम साउदीने उडी मारली पण सीमारेषेच्या आत त्याचा तोल जात होता, त्यामुळे त्याने बाहेर चेंडू फेकला. तेव्हा साऊदीच्या मागे येणाऱ्या करुण नायरने डाइव्ह करत झेल घेतला.
3. आयपीएल-8 च्या 22 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विकेटकिपर दिनेश कार्तिकने राजस्थान रॉयल्सच्या जेम्स फॉकनरची सुंदर कॅच घेतली.
4. दिल्ली डेअरडेव्हील्सच्या इम्रान ताहीरने मुंबई इंडियन्सच्या पार्थिव पटेलची घेतलेली कॅच. आधी तो बराच लांब पळत आला तरीही चेंडूपर्यंत पोहोचला नाही म्हणून डाइव्ह मारली आणि कॅच घेतली.
5. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या मनदीपची हवेत उडी मारत कॅच घेतली. ही एवढी सुंदर होती की मनदीपही काही काळ पाहत राहिला होता.
6. चेन्नई सुपरकिंग्सच्या फाफ डु प्लेसिसने मुंबई इंडियन्सच्या कोरी अँडरसनची कॅच घेतली.
7. चेन्नई सुपरकिंग्सच्या फाफ डु प्लेसिसने घेतलेली आणखी एक सुंदर कॅच. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या मनविंदर बिसलाला त्याने परत पाठवले.
8. ड्वेन ब्राव्होने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या दिनेश कार्तिकची पुढे डाइव्ह करत सुंदर कॅच घेतली.
9. कोलकाता नाइटराइडर्सच्या टेन डोश्टेने चेन्नई सुपरकिंग्सच्या ड्वेन स्मिथचा घेतलेला झेल सगळे पाहतच राहिले.
10. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या डेव्हीड विसेने 4 विकेट घेतल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी स्वतःच कॅच घेतली.