आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अ‍ॅथलेटपटूंमध्‍येही वाढली सिक्‍स पॅकची क्रेझ, फिट दिसण्‍यासाठी तासंतास व्‍यायाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - WWE ची रेसलर नावोमी)
जगातील प्रथम नामांकित टेनिसपटू सेरेना विल्‍यम्सने काही दिवसांपूर्वी सोशल साइट्सवर स्‍वत:च्‍या सिक्‍स पॅक बॉडीची छायाचित्रे पोस्‍ट केली होती. आणि तेथूनच कित्‍येक महिला खेळाडूंना सिक्‍स पॅक बॉडीचे वेध लागले होते. चपळ, आणि तंदुरुस्‍त दिसण्‍यासाठी सिक्‍स पॅक बॉडी उत्‍तम असते. त्‍यामुळेच सुडौल शरीरापेक्षा महिला अ‍ॅथलेटपटूंमध्‍ये सिक्‍स पॅक बॉडीची क्रेझ दिसून येत आहे.

शारापोव्‍हासुध्‍दा नाही मागे
सेरेना आणि शारापोव्‍हा यांच्‍यामधील शित युध्‍द अवघ्‍या क्रिडाविश्‍वाला माहित आहे. शारापोव्‍हानुसुध्‍दा वर्कआऊट करताना शॉट टॉप घालून सर्वांना तिने अप्रत्‍यक्षरित्‍या एप्‍स दाखविले होते. तर यापूर्वी अन्‍ना कुर्निकोवा, एमिली मॉरिस्‍मो आणि जस्टिन हेनिन सरीखी यासारख्‍या दिग्‍गज महिला खेळाडूंनी आपली पिळदार देहयष्‍टी दाखविली होती.
प्रत्‍येकजण दाखवू पाहते 'सिक्‍स पॅक'
सेरेना, शारापोव्‍हा सारख्‍या कित्‍येक टेनिसपटू, क्रिकेटपटू, बॅडमिंटनपटू आदी प्रत्‍येक खेळातील महिला खुप मेहनत करुन आपले शरीर पिळदार करतात. तसेच आहारावर नियंत्रण ठेवतात.

नाईलाजानेही ठेवतात 'सिक्‍स पॅक'
सिक्‍स पॅक बॉडी असेल तर प्रतिस्‍पर्धी खेळाडूवर मा‍नसिक दबाव टाकता येतो. शिवाय आजचे युग हे ग्‍लॅमरचे आहे. त्‍यामुळे फिट बॉडीमुळे लवकर स्‍पॉन्‍सर जोडता येतात.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सिक्‍स पॅक बॉडी बनविणा-या टॉप 10 महिला अ‍ॅथलेटपटू