आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Pak Cricketers Want Bilateral Series With India

मोदी-शरीफ भेटीनंतर आता भारतासोबत मालिकेची आफ्रिदी, अख्तरची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - शोएब अख्तर व शाहिद आफ्रिदीसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतासमवेत मालिका खेळवण्याची मागणी केली आहे. दोन देशांतर्गत मालिकांबाबत मोदी-शरीफ भेटीत चर्चा झाली असल्यास त्याला आपला पाठिंबाच असल्याचे मत क्रिकेटपटूंनी व्यक्त केले.
भारत व पाकिस्तानच्या जनतेला जवळ आणण्याचे काम या मालिकांनी अनेक वर्षे केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या खेळाडूंचे एकमेकांच्या देशात दौरे होणे अत्यावश्यक असल्याचे मत माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. पाकच्या पंतप्रधानांच्या भारताच्या पंतप्रधानासोबतच्या चर्चेचा आनंदच असल्याचेही शोएबने नमूद केले. विशेषत: पाक क्रिकेटला आर्थिक आधाराची गरज आहे. त्या दृष्टिकोनातूनही या मालिका होणे अत्यावश्यक आहेत. पाक खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्याचा मुद्दादेखील निकाली निघणे आवश्यक असल्याचे अख्तर या वेळी म्हणाला.