आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top World Women Athletes Who Won Olympic Gold Medal

TOP 20: क्रीडा जगतातील सोनेरी प-या, ज्‍यांनी रचला इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको- ऑलिम्पिकमध्‍ये पदक जिंकणे हे प्रत्‍येक खेळाडूचे स्‍वप्‍न असते. मेक्सिकोच्‍या सोर्या जिम्‍नेजने पदक पटकावण्‍याचे फक्‍त स्‍वप्‍नच पाहिले नाही तर ते वास्‍तवात उतरवले.

वर्ष 2000 साली सिडनी ऑलिम्पिकमध्‍ये सुवर्ण पदक पटकावून या चॅम्पियन वेटलिफ्टरने एक नवा इतिहास रचला होता. मात्र, ऑलिम्पिकमध्‍ये मेक्सिकन महिलांचे नाव उंचावणा-या सोर्याचे जीवन या वर्षी संपुष्‍टात आले. गत 28 मार्च रोजी सोर्याला अचानक ह्दयविकाराचा झटका आल्‍यामुळे तिचे निधन झाले. मृत्‍यूसमयी तिचे वय अवघे 35 वर्षे इतके होते.

सिडनी ऑलिम्पिकमध्‍ये 52 किग्रा वजनी गटात सुवर्ण पदक पटकावून मेक्सिकन महिलांसमोर उदाहरण ठेवले होते. तिच्‍यानंतर 2008 साली मारिया एस्पिनोजाने तायक्‍वांदोमध्‍ये सुवर्ण पदक मिळवले होते.

5 मार्च 1977 रोजी मेक्सिको सिटीमध्‍ये जन्‍मलेली सोर्या पदक जिंकल्‍यानंतर हालअपेष्‍टात जगत होती. पदक जिंकल्‍यानंतर तिला इतक्‍या वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले की, कोणाला याची कल्‍पनाही येऊ शकणार नाही. वाईट परिस्थिती असताना तिच्‍या कुटुंबियांनी तिची साथ सोडली. ती सतत इन्‍फ्लुएंजा आणि ओव्‍हरवेट सारख्‍या आजारांची शिकार बनली. तेव्‍हा तिच्‍या देखभालीसाठी कोणी पुढे आले नाही.

2002 मध्‍ये अथेंस ऑलिम्पिकपूर्वी सोर्याने निवृत्तीची घोषणा केली होती. सातत्‍याने होणा-या दुखापती आणि आजारपणामुळे वेटलिप्टिंगमध्‍ये तिला स्‍वत:चा फिटनेस मेंटेन करता आला नाही. निवृत्तीनंतर तिने काही काळ क्रीडासमालोचकाची भूमिका निभावली.

अनेकवेळा चित्रपटांमधील अभिनेत्रींना लक्षात ठेवले जाते. मात्र, क्रीडा जगतात पुरूष खेळाडूंच्‍या बरोबरीने घाम गाळणा-या महिलांना लोक विसरतात.

www.divyamarathi.com सोर्या जिम्‍नेजच्‍या क्रीडा जगतातील योदानाला सलाम करतो. त्‍याचबरोबर आम्‍ही ऑलिम्पिकमध्‍ये ज्‍या महिलांनी सुवर्ण पदक पटकावण्‍याचा कारनामा केला अशा खेळाडूंची माहिती देणार आहोत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या, कोणत्‍या सोनेरी कन्‍यांनी रचला ऑलिम्पिकमध्‍ये इतिहास...