आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईपीएल : टोटेनहॅमकडून सदरलँडचा 5-1 ने पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - टोटेनहॅमने इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये शानदार विजय मिळवला. या टीमने लढतीत सदरलँडचा 5-1 अशा फरकाने पराभव केला. अ‍ॅडेबोयरने (28, 86 मि.) केलेल्या गोलच्या बळावर टोटेनहॅमने सामना जिंकला. काने (59 मि.), एरिक्सन (78 मि.) आणि सिगुडरस्सन (90 मि.) यांनी टीमच्या विजयात प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. टोटेनहॅमचा लीगमधील हा 18 वा विजय ठरला. या सामन्यातील विजयासह टोटेनहॅमने लीगच्या गुणतालिकेत 59 गुणांसह सहाव्या स्थानी धडक मारली. तसेच सदरलँडला 18 व्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दमदार सुरुवात करताना सदरलँडने अवघ्या 17 व्या मिनिटाला 1-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर तब्बल 11 मिनिटे
टोटेनहॅमला बरोबरी मिळवण्यासाठी झुंज द्यावी लागली. अखेर अ‍ॅडेबायोरने गोल करून टीमला 1-1 ने बरोबरी
मिळवून दिली. यासह ही लढत मध्यंतरांपर्यंत 1-1 ने बरोबरीत राहिली.
दुसर्‍या हाफमध्ये कानेने गोल करून 2-1 ने आघाडी निश्चित केली. त्यापाठोपाठ एरिक्सनने गोल करून 3-1 ने आघाडीला मजबूत केले. शेवटच्या चार मिनिटांत अ‍ॅडेबायोरने टीमकडून चौथा गोल केला. त्यानंतर शेवटच्या मिनिटात सिगुरडस्सनने गोल करून टोटेनहॅमला 5-1 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला.
अ‍ॅथलेटिको क्लबचा विजय
ला फुटबॉल लीगमध्ये अ‍ॅथलेटिको क्लबने शानदार विजय मिळवला. या टीमने लेव्हांटे युडीला 2-1 ने पराभूत केले. अ‍ॅडुरिझने 15 आणि 44 व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर अ‍ॅथलेटिको क्लबने सामना जिंकला. या क्बलच्या सॅन जोसने 66 व्या मिनिटाला सामन्यात आत्मघातकी गोल करून दिला.