लीड्स - 'टूर डी फ्रान्स' या जगप्रसिद्ध सायकल शर्यतीचा 5 जुलै रोजी थाटात प्रारंभ झाला आहे. प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी केट यांनी या स्पर्धेची हारवूड हाऊस येथे फीत कापून अधिकृत उद्घाटन केले आहे.
जगातील सर्वांत लांब पल्ल्याच्या सायकलिंग शर्यतीमध्ये 198 रायडर्सनी सहभाग घेतला आहे. टूर डी फ्रान्सच्या उद्घाटन समारंभावेळी फ्रान्स आणि ब्रिटन देशांची राष्ट्रगीते वाजविण्यात आली. लीड्सच्या परिसरात या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या रायडर्सला प्रोत्साहन देण्यासाठी हजारो चाहते रत्याच्या दुतर्फा उभे होते.
स्पर्धेला यॉर्कशायर परिसरातील 190.5 कि.मी. पल्ल्याच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला.
(फोटोओळ- टूर डी फ्रान्स' स्पर्धेच्या पाहिल्या टप्प्यातील छायाचित्र)
पुढील स्लाइडवर पाहा, 'टूर डी फ्रान्स' स्पर्धेच्या पाहिल्या टप्प्यातील छायाचित्रे...