आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनी मुलांना देतात असे हार्ड ट्रेनिंग, पाहा अंगावर काटे आणणारे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारतात सध्या आयपीएलचा रोमांच सुरु आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात क्रिकेट अतिशय लोकप्रिय आहे. मात्र, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये क्रिकेट खेळलेही जात नाही आणि पाहिलेही जात नाही. चीन क्रिकेटपेक्षा इतर खेळावर फोकस करतो. विशेषत ऑलिंपिकमध्ये जे खेळ खेळले जातात त्यावर चीनने अधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. मागील काही दशकात चीन ऑलिंपिकमध्ये पहिल्या तीन देशात सातत्याने राहत आहे. यावरून तेथे क्रीडासंस्कृती किती व कशी रूजली हे लक्षात येते. 
 
चीन नेहमी ऑलंम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. परंतु यासाठी चीनच्या खेळाडूंनी लहानपणापासून किती मेहनत घ्यावी लागते याचा अंदाजा कुणालाही नसेल. यांच्या खेळाच्या, व्यायामाच्या प्रशिक्षणाविषयी कळल्यास अंगावर शहारे उभे राहतील. येथे खेळाडूंना लहानपणापासूनच हार्ड ट्रेनिंग दिले जाते. स्पिरिट वाढण्यासाठी चिमुकल्यांना बालपणीपासूनच तयार केले जाते. असेच प्रशिक्षण आर्मीत भरती होतानासुध्दा दिले जात नाही. या मुलांची लवचिकता वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येक व्यायाम आणि योगा शिकवला जातो.
 
एवढेच नव्हे, मुलांच्या खाण्या-पिण्यापासून, त्यांच्या वागणूक आणि शरीराच्या लवचिकतेकडे बारकाईने लक्ष दिले जाते. त्यांना लवचिकता वाढवण्यासाठी खास प्रसिक्षण दिले जाते. आम्ही जी छायाचित्रे आज तुम्हाला दाखवत आहोत, ती याची मोठी उदाहरणे आहेत. ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये देशाचे नाव उंचावण्यासाठी या मुलांना आणि खेळाडूंना कसे-कसे प्रशिक्षण दिले, हे देखील या छायाचित्रांतून दिसते. या मुलांना मात्र खूप याचा त्रास सहन करावा लागतो, काहींच्या वेदना पाहून आपल्याही अंगाला काटा उभा राहतो.
 
पुढे स्लाईड्द्वारे पाहा, चीनमध्ये मुलांना कसे दिले जाते हार्ड ट्रेनिंग....
बातम्या आणखी आहेत...