आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tri Nation Series : Lankan Beganing Not Well, 60 Runs And 3 Out

तिरंगी मालिका : लंकेची निराशाजनक सुरुवात, 60 धावांवर 3 गडी बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - तिरंगी वनडे मालिकेत रविवारी यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात पाहुण्या श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सामन्यात 19 षटकांअखेर लंकेला 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 60 धावा काढता आल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला. या वेळी कुमार संगकारा (11) व थिरिमाने (13) हे दोघे खेळत होते. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 31 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. दरम्यान, यजमान विंडीजच्या केमार रोचने सात षटकांत 19 धावा देऊन दोन गडी बाद केले. यासह त्याने दोन षटके निर्धाव टाकली.

होल्डरने पाच षटकांत 20 धावा देत एक विकेट घेतली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजचा कर्णधार केरोन पोलार्डने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. केमार रोच व होल्डरने पोलार्डचा निर्णय सार्थकी लावला. फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची चांगली सुरुवात झाली नाही. सामन्याच्या 4.1 षटकांत लंकेचे सलामीवीर थरंगा (7) व महेला जयवर्धने (7) झटपट बाद होऊन तंबूत परतले. होल्डरने थरंगाच्या रूपाने यजमानांना पहिला बळी मिळवून दिला. त्यापाठोपाठ रोचने जयवर्धनेला स्मिथकरवी झेलबाद केले. त्यानंतर 2 बाद 29 धावा असताना लंकेची तिसरी विकेट पडली. रोचने चांदीमलला (2) त्रिफळाचीत करून संघाला तिसरा बळी मिळवून दिला.