आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पोर्ट ऑफ स्पेन - श्रीलंकेने तिरंगी मालिकेत सोमवारी( ता.8) वेस्ट इंडिजला 39 धावांनी हरवले. लंकन संघाने 41 षटकारात 8 बाद 219 धावां केल्या होत्या. विजयासाठी 220 चे लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज 41 षटकारात 9 बाद 190 धावा केल्या. ख्रिस्ट गेल ( 14 ), किरॉन पोलार्ड (0) ही नेहमी प्रमाणे कमी धावा करून बाद झाले. ब्राव्हो ( 67 ), सिमॉन ( 50 ) यांनी भागीदारीतून चांगली धावसंख्या उभारली.
तिरंगी मालिकेतील महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडीजविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 219 धावा काढल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी अर्धवट सुटलेला सामना सोमवारी पुढे खेळवण्यात आला. सोमवारीसुद्धा वरुणराजाने हजेरी लावल्याने सामना प्रत्येकी 41 षटकांचा करण्यात आला. माजी कर्णधार कुमार संगकाराच्या (नाबाद 90) अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने सन्मानजनक स्कोअर उभा केला.
रविवारचा खेळ 3 बाद 60 धावांवर थांबला होता. त्यानंतर सोमवारी एका टोकाने एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने संगकाराने नाबाद 90 धावा काढल्या. संगकाराने 95 चेंडूचा सामना करताना 1 षटकार आणि 6 चौकारांसह ही खेळी केली. कर्णधार अँग्लो मॅथ्यूजने 30 आणि थिरिमानेने 23 धावा काढून त्याला साथ दिली. इतर फलंदाजांनी निराशा केली. वेस्ट इंडीजकडून केमर रोमचने 8 षटके गोलंदाजी करताना 27 धावांत 4 विकेट आणि होल्डरने 2 गडी बाद केले. मार्लोन सॅम्युअल्स आणि केरोन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.