आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका : इंग्लंडचा पराभव, स्मिथने काढल्या १०२ नाबाद धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : स्टीव्हन स्मिथ
होबार्ट - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने शुक्रवारी विजयी हॅटट्रिकसह तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीतील प्रवेशाचा दुहेरी योग जुळवून आणला. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपल्या तिस-या सामन्यात इंग्लंडवर ३ गड्यांनी मात केली. यासह यजमान संघ अंतिम फेरीत दाखल झाला.
कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या (नाबाद १०२) शानदार शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ८ गड्यांच्या मोबदल्यात ३०३ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून लक्ष्य गाठले. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत तिस-या विजयाची नोंद केली. इंग्लंडचा हा दुसरा पराभव ठरला.

धावांचा पाठलाग करणा-या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर अॅरोन फिंच (३२) आणि शॉन मार्श (४५) यांनी संघाला ७६ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. यासह यजमानांनी सामन्यावर पकड घेतली. दरम्यान, मोईन अलीने ही जोडी फोडली. त्याने फिंचला त्रिफळाचीत करून संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्यापाठोपाठ शॉन मार्शला फिनने बेलकरवी झेलबाद केले. मार्शने ४८ चेंडूंचा सामना करताना सहा चौकारांच्या आधारे ४५ धावा काढल्या.

स्मिथने त्यापाठोपाठ ग्लेन मॅक्सवेलसोबत चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. दरम्यान, सामन्यात ३७ धावा काढून मॅक्सवेल तंबूत परतला. त्यानंतर स्मिथसोबत सुरेख फलंदाजी करताना जेम्स फ्युकनरने ५५ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. यात फ्युकनरने ३५ धावांचे योगदान दिले. त्यापाठोपाठ स्मिथ आणि हॅडिन यांनीही पाचव्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. गोलंदाजीत इंग्लंडकडून क्रिस वोक्स, मोईन अली आणि स्टीव्हन फिनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पुढे वाचा स्मिथचा शतकी दणका