आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tri Series: India Defeated South Africa By 18 Runs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिरंगी मालिका : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 18 धावांनी विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया - सलामीवीर शिखर धवन (85), रोहित शर्मा (65), सुरेश रैना (60) आणि अंबाती रायडू (57) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर भारतीय अ संघाने शुक्रवारी तिरंगी वनडे मालिकेतील आपल्या दुसर्‍या सामन्यात डीएल नियमानुसार आफ्रिकेवर 18 धावांनी विजय मिळवला. भारताचा मालिकेतील हा पहिला विजय ठरला. या विजयासह भारताने चार गुणांची कमाई केली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रथम फलंदाजी करणार्‍या टीम इंडियाने 38 षटकांत पाच बाद 309 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका अ संघाने 34.4 षटकांत पाच गडी गमावून 258 धावांपर्यंत मजल मारली. आफ्रिकेसमोर विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. भारताकडून परवेझ रसूल य नदीमने प्रत्येकी दोन गडी बाद केले. उनादकटने एक विकेट घेतली. आफ्रिकेकडून जास्र्वेल्ड (69) व एगरची (84) खेळी व्यर्थ ठरली.

तत्पूर्वी भारताकडून धवन व रोहितने पहिल्या गड्यासाठी 140 धावांची भागीदारी केली. धवनने 67 चेंडूंत 85 धावा काढल्या. रोहितने 65 चेंडूंत 65 धावांची खेळी केली. कर्णधार पुजारा (9) पुन्हा एकदा सामन्यात अपयशी ठरला. रायडू व रैनाने चौथ्या गड्यासाठी 89 धावांची भागीदारी केली. यात रैनाने दुसरे अर्धशतक झळकावले. आफ्रिकेकडून विल्जाईन व जस्टिन ओगटोंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : भारत अ संघ : 5 बाद 309 धावा वि.वि. दक्षिण आफ्रिका अ संघ : 5 बाद 258 धावा.


आफ्रिका दौर्‍यात होणार बदल
जोहान्सबर्ग 2 आगामी नोव्हेंबरमधील भारतीय संघाच्या आफ्रिका दौर्‍यात बदल होण्याचे संकेत दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारुण लोगर्ट यांनी दिले. लोगर्ट यांच्या नियुक्तीला बीसीसीआयचा विरोध आहे. त्यामुळे हा बदल होण्याची शक्यता आहे. दौर्‍यात भारत व दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी, सात वनडे आणि दोन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.