आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका : इंग्लंडविरोधात जिंकायचे असेल तर भारताने या Tips वापराव्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील भारताचा अखेरचा साखळी सामना भारत-इंग्लंड दरम्यान शुक्रवारी पर्थमध्ये होणार आहे. दोन्ही संघांसाठी या सामन्यात 'करा किंवा मरा' अशी अवस्था असणार आहे. त्याचे कारण म्हणजे जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम सामन्यात प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियाने आधीच मालिकेची अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात कोणत्याही संघाला बोनस गुण किंवा मोठ्या फरकाने विजयाची आवश्यकता नसून केवळ सामना जिंकणेही पुरेसे ठरणार आहे. जर काही कारणास्तव सामना टाय किंवा रद्द झाला तर इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचणार आहे.

या मालिकेत भारताला अद्याप एकही विजय मिळालेला नाही. त्यामुळे भारताच्या संघाला अधिक काळजीपूर्क खेळ करावा लागणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही त्यासाठी रणनीती बदलावी लागणार आहे. खेळपट्टीचा विचार करायचा झाल्यास पर्थवर चेंडू उसळण्याचे प्रमाण अधिक असते. सध्याची कामगिरी पाहता धोनी सेनेसाठी इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करणे सोपे ठरणार नाही. दोन्ही देशांमध्ये ब्रिस्बेन येथे खेळण्यात आलेल्या यापूर्वीच्या सामन्याचा विचार करता स्टीव्हन फिन (5 वीकेट) आणि जेम्स अँडरसन (4 विकेट) यांच्यासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली होती. त्यामुळे संपूर्ण संघ अवघ्या 153 धावांवर गारद झाला होता. इंग्लंडने तो सामना 9 गडी राखून जिंकला होता.
भारताला जर या मालिकेची अंतिम फेरी गाठायची असेल आणि विश्वचषकापूर्वी आपला दम दाखवायचा असेल तर भारताला खालील टिप्सवर लक्ष द्यावे लागेल.

धवनला सलामीहून हटवावे
सर्वात आधी खराब फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनला सलामीवरून हटवावे लागणार आहे. याच मालिकेत गेल्या तीन सामन्यात तो क्रमाणे 2, 1 आणि 8 धावा करून बाद झाला होता. कोणत्याही सामन्यात त्याला दुहेरी धावसंख्याही गाठता आलेली नाही. त्यामुळे भारताची सुरुवातच खराब होत आहे. त्याचाच परिणाम संपूर्ण संघावर होत आहे.

सलामीला कोणाला ठेवावे?
शिखर धवन ऐवजी रोहित शर्माला सलामीची संधी द्यायला हवी. पण या सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे रोहित खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रोहित हा सामना खेळू शकला नाही तर स्टुअर्ट बिन्नीला संधी मिळू शकते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बिन्नीनेच भारताकडून सर्वाधिक 44 धावा केल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा इतर काही टिप्स...