आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिकेतून भारताचे आव्हान संपुष्टात, इंग्लंडने तीन विकेटने केला पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - रैना बाद झाल्यानंतर जल्लोष करणारे इंग्लंडचे खेळाडू.
पर्थ - ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारताचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. आज पर्थ येथील मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा तीन गडी राखून पराभव केला. भारताने इंग्लंडसमोर 201 धावांचे आव्हान उभे केले होते. त्याला प्रत्त्युत्तर देताना इंग्लंडचा संघ एकवेळ 5 बाद 66 अशा अडचणीत आला होता. मात्र, त्यानंतर सलामीवीर जेम्स टेलर (82) आणि ज्यो बटलर (66) यांनी सहाव्या विकेटसाठी 125 धावांची दमदार भागीदारी केली. त्यामुळे 5 बाद 66 वरून इंग्लंडने 191 पर्यंत मजल मारली. मात्र, त्यानंतर टेलरला मोहित शर्माने व बटलरला शमीने टिपल्याने इंग्लंडची स्थिती 7 बाद 193 अशी झाल्याने सामन्यात रंगत आली. मात्र, त्यानंतर ब्रॉड व वोक्स यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट बिन्नी याने 33 धावांत 3 गडी बाद करीत इंग्लंडला बॅकफूटवर नेले होते. मात्र, त्याला इतर गोलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही. मोहित शर्माला 2 तर शमी आणि अक्षर पटेलला प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याआधी सलामीवीर इयान बेलला मोहित शर्माने 10 धावांवर पायचित केले. तर अक्षर पटेलने मोईन अलीला 17 धावावंर अंबाती नायडूकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर खेळायला आलेल्या ज्यो रूटला स्टुअर्ट बिन्नीने केवळ 3 धावांवर आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर कर्णधार इयान मॉर्गन (2) आणि रवी बोपाराला 4 धावांवर बिन्नीने झेलबाद केले. सलामीवीर जेम्स टेलरने एकहाती किल्ला लढवित 82 धावा केल्या.
चांगल्या सुरुवातीनंतरही भारताची हाराकिरी-
राहणे आणि धवन यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही उर्वरित भारतीय फलंदाजांची हाराकिरी पाहायला मिळाली. पण अखेरच्या षटकांत शमी टिकल्यामुळे भारताला दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची संथ पण चांगली सुरुवात झाली. वीस षटके भारताचे दोन्ही सलामीवर मैदानावर टिकून होते. पहिल्या विकेटसाठी धवन आणि राहणे यांनी 83 धावांची भागीदारी केली. पण 38 धावांवर खेळत असताना धवन बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर रूटच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर कोहली झेलबाद झाला. त्यापाठोपाठ मैदानवर आलेला रैनाही वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रायडूही केवळ 12 करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर फिनने राहणेच्या रुपाने सामन्यातील पहिली पण सर्वात महत्त्वाची अशी वीकेट घेतली. त्याने 73 धावा केल्या. त्यानंतर इंग्लडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करणारा बिन्नीही स्वस्तात बाद झाला. बिन्नी पाठोबाठ धोनी, जडेजा आणि अक्षर पटेल हजेरी लावून गेल्यासारखे बाद झाले. त्यानंतर शमी मैदानावर टिकला त्याने फटकेबाजी करत चाहत्यांना काहीसा आनंदही दिला. पण त्याला फार मोठी खेळी करता आला नाही. तरीही त्याने भारताला 200 धावांचा टप्पा गाठून देण्यात महत्त्वाची कामगिरी निभावली.
मालिकेत भारताची कामगिरी आतापर्यंत सुमारच ठरली आहे. भारताने आतापर्यंत 15 खेळाडूंना संधी दिली. सलामीवीर रोहित शर्मा वगळता उर्वरित एकालाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. वाईट बातमी म्हणजे दुखापतीमुळे रोहित या सामन्यात सुद्धा खेळणार नाही. अशा परिस्थितीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रैना, धोनी यांच्यावर दबाव वाढेल. आतापर्यंत रहाणेने ३ सामन्यांत 73 धावा काढल्या. धवनने अनुक्रमे 2, 1 व 8 धावांचे योगदान दिले. विराटला तीन डावांत केवळ 53 धावा काढता आल्या. धोनीने दोन डावांत 53 धावा जोडल्या. गोलंदाजांनी सुद्धा निराशाच केली. अक्षर पटेलने 3 सामन्यांत एक विकेट घेतली. शमी, भुवनेश्वरचे प्रदर्शन साधारण ठरले. आता ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
पुढील स्लाइड्वर पाहा, सामन्याचे इतर PHOTO
अखेरच्या स्लाइडवर पाहा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक...