आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरंगाची तुफानी फलंदाजी; श्रीलंकेकडून भारताचा दणदणीत पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगस्टन- सलामीवीर उपुल थरंगाच्या (नाबाद 174) तुफानी फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने तिरंगी मालिकेत भारताचा पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. लंकेने भारताचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. माजी कर्णधार महेला जयवर्धनेनेही (107) शानदार शतक ठोकले. श्रीलंकेने भारताला 161 धावांवर रोखले.

दरम्यान, धोनीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व करणार्‍या विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लंकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजी फोडून काढताना 50 षटकांत 1 बाद 348 धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी 348 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 44.5 षटकांमध्‍ये 187 धावांमध्‍येच संपुष्‍टात आला. खेळपट्टीवर खेळत असलेल्या भारतीय संघाला धोनीची उणीव क्षणोक्षणी जाणवत होती. या सामन्यात शिखर धवन(24), विराट कोहलीला(2) ही आपली जादू दाखवता आली नाही.

यापूर्वी, विराट कोहलीने टॉस जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस बोलावले. त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. श्रीलंकेचे सलामीवीर जयवर्धने आणि थरंगा यांनी 38.4 षटकांत तब्बल 213 धावांची सलामी दिली. त्यांच्या द्विशतकी भागीदारीने सामन्याचे चित्रच बदलले. नंतर थरंगाने कर्णधार मॅथ्यूजसोबत दुस-या विकेटसाठी 68 चेंडूंत 135 धावांची भागीदारी केली.

थरंगाने धो धो धुतले : उपुल थरंगाने भारतीय गोलंदाजांना धो धो धुतले. थरंगाने 159 चेंडूंचा सामना करताना 3 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने नाबाद 174 धावा काढल्या. जयवर्धनेने 112 चेंडूंत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 107 धावा काढल्या. थरंगासह तिस-या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या कर्णधार मॅथ्यूजने नाबाद 44 धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : 50 षटकांत 1 बाद 348. (उपुल थरंगा नाबाद 174, जयवर्धने 107, मॅथ्यूज नाबाद 44, 1/67 अश्विन).

भारत - 44 षटक 5 चेंडूत 10 बाद 187.