आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाचा ब्रिस्बेनवर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांच - दिनेश रामदीन (48 धावा) आणि वेगवान गोलंदाज रवी रामपॉलच्या (14 धावांत 4 विकेट) घातक गोलंदाजीच्या बळावर त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाने चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेच्या दुस-या सामन्यात रविवारी ब्रिस्बेन हिट संघाला 25 धावांनी नमवले. त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 135 धावा काढल्या. मात्र, कॅरेबियन गोलंदाजांनी ब्रिस्बेन हिटला अवघ्या 110 धावांत गुंडाळून रोमांचक विजय मिळवला.


ब्रिस्बेनची डळमळीत सुरुवात
विजयासाठी आवश्यक असलेल्या 136 धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हिटची सुरुवात चांगली झाली नाही. रामपॉलने तिस-याच षटकात जेम्स होप्सला 4 धावांवर बाद करून धक्का दिला. तिस-या क्रमांकावर आलेल्या फॉरेस्टने 16 धावांचे योगदान दिले. सलामीवीर बर्न्सने ब्रिस्बेनकडून सर्वाधिक 45 धावा काढल्या.


मुंबई-ओटागो आज सामना
चॅम्पियन्स लीगमध्ये सोमवारी मुंबई इंडियन्स व न्यूझीलंडच्या ओटागो यांच्यात रात्री आठ वाजता सामना होणार आहे. शनिवारी मुंबई इंडियन्सला सलामी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे स्पर्धेत विजयाने सुरुवात करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. दुसरीकडे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची बॅट या सामन्यात शांत होती. त्यामुळे ओटागोविरुद्धच्या सामन्यात सचिनकडून मोठ्या खेळीची आशा आहे. दुसरीकडे पात्रता फेरीतील तीन सामने जिंकून ओटागोने मुख्य फेरी गाठली. या संघाने तिस-या सामन्यात सनराझर्स हैदराबादला पराभूत केले होते. ही विजयी लय कायम ठेवण्याचा ओटागोचा प्रयत्न असेल.