आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trouble In Sania Mirza And Shoiab Malik Relation Due To News Love

सानिया-शोएबचे बिनसले, त्याच्या आयुष्यात हुमैमा तर तिच्या राम चरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक.)
नवी दिल्ली- पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याशी लग्न करणार असल्याचे भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने सांगितल्यावर मोठा गोंंधळ उडाला होता. या लग्नाला काही लोकांनी आणि संस्थांनी जोरदार विरोध केला होता. यावेळी नाट्यमय घडामोडीही घडल्या होत्या. पण अखेर दोघांनी लग्न केले. आता हे लग्न मोडण्याच्या काठावर असल्याचे समजते. शोएबच्या आयुष्यात पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक तर सानियाची तेलगू अभिनेता राम चरण याच्यासोबत जवळीक वाढल्याचेही वृत्त आहे.
दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येत असल्याचे पाकिस्तानी मीडियाने सांगितले आहे. शोएब मलिक सध्या हुमैमा मलिक आणि तिच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, याचा शोएबने इन्कार केला आहे. हुमैमा केवळ माझी चांगली मैत्रिण असल्याचे त्याने सांगितले आहे.
मलिकने सांगितले, की सानिया आणि माझ्यात मजबूत नातेसंबंध आहे. लग्नाच्या पूर्वीही आम्हाला माहित होते, की हे लग्न एवढे सोपे राहणार नाही. आम्ही दोघेही आमच्या क्षेत्रांमध्ये व्यस्त आहोत यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही. याचा अर्थ असा नाही, की आमच्या नात्यात समस्या आल्या आहेत. जेव्हा वेळ मिळते आम्ही सोबत असतो. सध्या आम्ही दुबईत एकत्र आहोत.
सानिया मिर्झाने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून शोएबसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पण मीडियात आलेल्या वृत्तानुसार गेल्या सहा-सात महिन्यांपासून दोघांमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे दोघांमध्ये कधीही घटस्फोट होऊ शकतो.
पुढील स्लाईडवर बघा, शोएब आणि हुमैमा मलिक यांची छायाचित्रे....