आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅस्ट्रोटर्फ, ट्रॅकसाठी प्रयत्न : श्याम सुंदर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद - औरंगाबादच्या केंद्रावर हॉकीचे अ‍ॅस्ट्रोटर्फ, सिंथेटिक ट्रॅक आणि शूटिंग रेंजसाठी आधीपासून प्रस्ताव आलेला आहे. या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. मात्र, क्रीडा मंत्रालयात हा प्रस्ताव सध्या अडकलेला आहे. हा प्रस्ताव त्वरित मंजूर होऊन कार्यान्वित व्हावा, यासाठी आता विशेष प्रयत्न करेन, असे आश्वासन भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक श्याम सुंदर यांनी दिली. राष्‍ट्रीय पायका स्पर्धेच्या निमित्ताने औरंगाबादेत आले असता ‘दिव्य मराठी’शी ते बोलत होते.

औरंगाबादच्या केंद्राकडे जागा मोठ्या प्रमाणावर आहे.या जागेचा सदुपयोग होण्यासाठी अ‍ॅस्ट्रोटर्फ, सिंथेटिक ट्रॅक गरजेचे आहे. यामुळे या केंद्राचा विकास होईल. सध्या हे प्रस्ताव मुख्यालयात आहेत. ते त्वरित मान्य होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. या केंद्रात नव्याने तयार झालेल्या मेडिसन सेंटर आणि व्यायाम शाळेचे साहित्यही लवकरच पाठवले जाईल. येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम होऊ शकेल. शिवाय येथे मेंटेनन्सचे कामही आहे. याला जवळपास 52 लाखांचा खर्च आहे. जुने काम पूर्ण करण्यावर आम्ही आधी जोर देत आहोत. नंतर नव्या योजनेबाबत विचार करू,असेही त्यांनी स्पष्ट केले.

साईची ‘कम अँड प्ले’ योजना सध्या दिल्लीत अधिक यशस्वी ठरत आहे. ही योजना सर्वांसाठीच आहे. शहरातील सर्व खेळ संघटनांनी साईच्या सुविधेचा लाभ घ्यावा. त्यांनी आपल्या खेळाडूंना साईत प्रशिक्षण द्यावे. याचा सर्वांना लाभच होईल. आमच्या विविध केंद्रापैकी भोपाळचे केंद्र अधिक अ‍ॅक्टिव्ह आहे. तेथे नव्याने उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा शानदारपणे उपयोग होत आहे. कांदिवलीचेही केंद्रही चांगले आहे,
असेही त्यांनी नमूद केले.