आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Try Sirias :today Do Or Die Match For India Vs England

तिरंगी मालिका : फायनलसाठी आज इंग्लंडविरुद्ध भारत, जिंका किंवा गाशा गुंडाळा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये प्रवेशासाठी शुक्रवारी टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात झुंज होईल. या सामन्यातील विजेता फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत खेळेल. स्पर्धेत भारताला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. इंग्लंडने मात्र एक विजय भारतावरच मिळवला आहे. इंग्लंडचे ५ तर भारताचे २ गुण आहेत. हा सामना जिंका अथवा तिरंगी मालिकेतून गाशा गुंडाळा, अशी स्थिती भारतापुढे आहे.

मालिकेत भारताची कामगिरी आतापर्यंत सुमारच ठरली आहे. भारताने आतापर्यंत १५ खेळाडूंना संधी दिली. सलामीवीर रोहित शर्मा वगळता उर्वरित एकालाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. वाईट बातमी म्हणजे दुखापतीमुळे रोहित या सामन्यात सुद्धा खेळणार नाही. अशा परिस्थितीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रैना, धोनी यांच्यावर दबाव वाढेल. आतापर्यंत रहाणेने ३ सामन्यांत ७३ धावा काढल्या. धवनने अनुक्रमे २, १ व ८ धावांचे योगदान दिले. विराटला तीन डावांत केवळ ५३ धावा काढता आल्या. धोनीने दोन डावांत ५३ धावा जोडल्या.

गोलंदाजांनी सुद्धा निराशाच केली. अक्षर पटेलने ३ सामन्यांत एक विकेट घेतली. शमी, भुवनेश्वरचे प्रदर्शन साधारण ठरले. आता ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.
* स्पर्धेत भारतीय संघाला अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा
* थेट प्रक्षेपण सकाळी ८.५० वा. दूरदर्शन, स्टार स्पोर्ट्‌सवर
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय म्‍हणाला धोनी ...