आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRICKET: मंगळवारी जाहीर होणार 2015 विश्‍वचषकाचा कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 2015चा विश्‍वचषक कार्यक्रमाची घोषणा उद्या (मंगळवार) करणार आहे. ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझीलंड संयुक्‍तरित्‍या या स्‍पर्धेचे आयोजक आहेत. आयसीसी विश्‍वचषक 2015चे स्‍थळ, पूल आणि कार्यक्रमांची घोषणा मेलबर्न आणि वेलिंग्‍टन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता 30 जुलै रोजी होईल असे आयसीसीच्‍या निवेदनपत्रात म्‍हटले आहे.

मेलबर्न येथे पेनिनसुला, सेंट्रल पियर, 161 हार्बर इस्‍पलानेड, डाकलँड येथे तर वेलिंग्‍टन येथील शेड 22, कॉर्नर तारानाकी सेंट आणि केब सेंट, वेलिंग्‍टन (सिरसा थिएटर) येथे या टुर्नामेंटमधील सामने होतील.

मेलबर्न येथे याची घोषणा आयसीसीचे उपाध्‍यक्ष मुस्‍तफा कमला, आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक 2015ची स्‍थानिक आयोजन समितीचे अध्‍यक्ष राल्‍फ वॉटर्स, आयसीसी मुख्‍य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन आणि आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक स्‍थानिक समितीचे मुख्‍य कार्यकारी जॉन हार्नडेनद्वारे केली जाईल. वेलिंग्‍टनमध्‍ये आयसीसी अध्‍यक्ष एलेन इसाक आणि आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक 2015 न्‍यूझीलंड प्रमूख थिरेसे वॉल्‍श कार्यक्रमाची घोषणा करतील.