नवी दिल्ली - कतारमधील दाेहा येथे हाेत असलेल्या अाशियाई युवा चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचा २२ सदस्यांचा संघ बुधवारी रवाना झाला. त्यात नाशिकच्या दुर्गा देवरे या धावपटूसह अन्य ८ मुली अाणि नाशिकच्याच किसन तडवी या युवा धावपटूसह अन्य १२ मुलांचा समावेश अाहे. जगभरातील ४० देशांमधील ४०० अॅथलिट्सचा सहभाग असल्याने त्याला महत्व आहे. गत महिन्यात गाेव्यात झालेल्या राष्ट्रीय युवा स्पर्धेतील विजेते तसेच साेनिपतमध्ये अाठवडाभर चाललेल्या शिबिरातून या २२ सदस्यांची निवड करण्यात अाली अाहे. या खेळाडूंबराेबर मुख्य प्रशिक्षक देखील जाणार आहेत.
खेळाडूंकडून अपेक्षा
या युवा संघात निवड झालेले सर्वच खेळाडू हे उत्कृष्ट कामगिरी करतील, युवा अॅथलिट्ससाठी वर्षभराचा कार्यक्रम निश्चित करण्यात अाला असून त्यानुसार त्यांची जय्यत तयारी करून घेण्यात येत अाहे.
अादिल सुमारीवाला, अध्यक्ष, अॅथलेटिक्स फेडरेशन अाॅफ इंडिया
भारतीय संघ
मुली : दुर्गा देवरे (१५०० मीटर), अलिशा राजू , अनुमाेल थंपी (३००० मीटर), जिस्ना मॅथ्यू (२०० मीटर अाणि ४०० मीटर), सयाना अाेमाना, तियाशा समद्देर (४०० मी. हर्डल्स), सीमा (थाळीफेक), लायमन नर्झरी (उंच उडी), साेनल गाेयल (गाेळा व थाळीफेक).
मुले : किसन तडवी (३००० मी.), अभिषेक द्राल (भालाफेक), अाशिष भालाेथिया (गाेळाफेक), अाशिष जाखर (हाताेडाफेक), बिअांतसिंग (८०० मी.), चंदन बावरी (२०० अाणि ४०० मीटर).