आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Shooter Suspends For Sexual Case At Germany Junior Shooting Championship

लैंगिक शोषणाच्या आरोपावरून दोन भारतीय नेमबाज निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर्मनीत नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्यूनियर नेमबाजी चॅम्पियनशिपदरम्यान लैंगिक शोषणाच्या आरोपावरून दोन नेमबाजांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जर्मनीत झालेल्या चॅम्पियनशिपदरम्यान एका महिला शॉटगन नेमबाजने आपल्या दोन सहकार्‍यांविरोध तक्रार दाखल केली होती. दोघांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघाने (एनआरएआय) दोन्ही नेमबाजांना चौकशी सुरु असेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही खेळाडूंची नावे मात्र कळू शकली नाहीत. फिनलॅंड येथे होणार्‍या शॉटगन चॅम्पियनशिपमध्येह‍ी ते भारतीय संघाकडून खेळणार होते. परंतु त्यांच्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची नावे मागे घेण्यात आली आहेत. एनआरएआयच्या एका ‍वरिष्ठ अधिकार्‍याकडे दोघांविरुद्ध तक्रार आली होती. त्यानंतर त्यांनी दोघांनी चौकशी सुरु असेपर्यंत निलंबित केले आहे.

दोन्ही नेमबाज ज्यूनियर भारतीय संघाचे सदस्य होते. त्यांनी भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदक जिंकून दिले होते. तक्रारीची फाईल एनआरएआय एथलीट समितीकडे सादर करण्‍यात आली आहे. माजी नेमबाज मुराद अली खान हे या समितीचे अध्यक्ष आहेत.