आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Very Talented Players, Terrorism And Stunami Disaster Minor Before Them

वर्ल्डकप २०१५मधील दोन जिगरबाज खेळाडू; जिद्दीपुढे दहशतवाद, सुनामीचे संकटही थिटे ठरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यंदाच्या वर्ल्डकपमधील एक खेळाडू मोहंमद नबी. त्याच्यासारखाच दुसरा दिनेश चांदिमल. न्यूझीलंडचे शहर ख्राइस्टचर्च. या तिघांत बरेच साम्य आहे. काळाने त्यांच्या मुळावर घाव घातले होते. ते उद्ध्वस्त झाले. आता जगाच्या मंचावर तिघेही चमकणार आहेत. विश्वचषकात पहिल्यांदाच उतरणा-या अफगाण संघातून नबी क्रिकेटविश्वात पदार्पण करत आहे. दबदबा राखणा-या श्रीलंकेच्या संघात दिनेश आहे. शुभारंभाचा सामना ख्राइस्टचर्च शहरात होणार आहे.

दहशतवादाने बेघर केले होते, आज अफगाण संघाचा कर्णधार
मोहंमद नबी १९८५ मध्ये जन्मला तेव्हा संपूर्ण कुटुंब बेघर होते. दहशतवादाने त्याच्या कुटुंबाला निर्वासित छावणीत आणून सोडले होते. पेशावरच्या छावणीत बॉम्ब, बंदुकांच्या आवाजात नबी मोठा झाला. वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्यांदा बॅट हाती घेतली. बॅट कुठली? बॅटसारखी लाकडी फळी होती. छावणीतील तणावपूर्ण वातावरणात तासन् तास टेनिस बॉलवर सराव केला. चिकाटी कामी आली. २००९मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. स्कॉटलंडविरुद्ध पहिल्यांदा वन डे खेळला. आज अफगाणिस्तान संघाचा कर्णधार आहे.

पुढे वाचा सुनामीत चिकाटी शाबूत