आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Victory Important For The Ranking To Indian Cricket Team

क्रमवारी : अव्वल स्थान राखण्यासाठी भारताला दोन विजय आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रविवारपासून दस-याच्या मुहूर्तावर सुरू होणा-या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत, जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन क्रमांकांवर असलेले संघ एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.
या वेळी 123 गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी मालिकेतील किमान दोन सामन्यांतील विजय पुरेसे आहेत. पाहुणां ऑस्‍ट्रेलियाला क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होण्यासाठी यजमान भारताला 6 विरुद्ध 1 असे पराभूत करावे लागेल.
ऑस्‍ट्रेलियाचे क्रमवारीत आता 115 गुण असून 6-1 असा विजय मिळवल्यास त्यामध्ये आणखी 6 गुणांची भर पडेल. त्याच वेळी भारताने मालिका 1-6 अशी गमावली तर भारताच्या खात्यातील 5 गुण कमी होतील. म्हणजे
भारताचे 118 गुण होतील.
या मालिकेत उभय संघांतर्फे विश्व फलंदाजीच्या क्रमवारीतील तब्बल 4 फलंदाज खेळणार आहेत. विराट कोहली(4), महेंद्रसिंग धोनी (7), जॉर्ज बेली(9) व शेन वॉटसन (10) हे फलंदाज टॉप टेनमध्ये आहेत.
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजा गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तसेच क्रमवारीत क्लिंट मकाय (7) व मिशेल जॉन्सन (8) हे खेळाडू टॉप टेनमधील आहेत. भारताचा आर. अश्विन (18) व भुवनेश्वरकुमार (20) हे अन्य गोलंदाज आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळताना पाहावयास मिळतील.
संघांची क्रमवारी
क्र. संघ गुण
1 भारत 123
2 ऑस्ट्रेलिया 115
3 इंग्लंड 111
4 श्रीलंका 111
5 द. आफ्रिका 105
6 पाकिस्तान 101
7 न्यूझीलंड 89
8 वेस्ट इंडीज 89
9 बांगलादेश 76